


* तब्बल 1 हजार कोटीची महसूल निर्मिती
मुंबई, 3 डिसेंबर (हिं.स.) : महाराष्ट्रात प्रथमच रियल इस्टेट क्षेत्रात पुण्यातील क्रिसाला हिरानंदानी टाउनशिपने भारतातील कुठल्याही निवासी प्रकल्पाने आजवर साधले नाही असा नवीन विक्रम रचला आहे. केवळ एका दिवसात १,१०० पेक्षा जास्त घरांचे बुकिंग झाले असून आणि तब्बल १,००० कोटी रुपयांचा महसूल निर्मिती यानिमित्ताने झाली आहे. या राष्ट्रीय विक्रमाच्या माध्यमातून पुणे शहरासह महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्राला नवीन कलाटणी मिळणार आहे.
दरम्यान, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील घरांचे वाटप करण्यात आले असून आता दुसऱ्या टप्प्यातील घर वाटप लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात घर मिळवू न शकलेल्या ग्राहकांसाठी क्रिसाला - हिरानंदानीकडून विशेष लाभ दिले जातील असे यावेळी व्यवस्थापनाने सांगितले.
या प्रकल्पाला मिळालेला प्रतिसाद पाहून हिरानंदानी कम्युनिटीजचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी म्हणाले,“हा फक्त विक्रम नाही तर हा कुटुंबांनी आणि गुंतवणूकदारांनी क्रिसाला हिरानंदानीच्या दृष्टीकोनावर ठेवलेल्या विश्वासाचा पुरावा आहे. या जबरदस्त प्रतिसादामुळे पुणे जागतिक दर्जाच्या, मोठ्या प्रमाणात एकात्मिक टाउनशिपसाठी पूर्णपणे सज्ज आहे हे सिद्ध केले. ही टाउनशिप फक्त उत्तर हिंजवडी नव्हे तर भारताच्या रिअल इस्टेटच्या इतिहासातील एक प्रतिष्ठीत प्रकल्प ठरेल.”
यावेळी क्रिसाला डेव्हलपर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक सागर अग्रवाल म्हणाले,“आम्हाला मिळालेला प्रतिसाद अविश्वसनीय आणि मनाला स्पर्श करणारा होता. एका दिवसात १,१०० घरांची नोंदणी व १,००० कोटी रुपयांचा महसूल मिळवून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणे हा केवळ क्रिसालासाठीच नव्हे तर या प्रवासात सामील झालेल्या प्रत्येक ग्राहकासाठी अभिमानाचा क्षण आहे. जे लोक पहिल्या टप्प्यात सामील होऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी दुसरा टप्पा लवकरच खुला होणार आहे आणि त्यांचे या प्रकल्पात तेवढ्याच प्रेमाने व सन्मानाने स्वागत केले जाईल.”
उत्तर हिंजवडीतील १०५ एकरांवर पसरलेली क्रिसाला–हिरानंदानी टाउनशिप ही पुण्याची पहिली ब्रँडेड रिसॉर्ट-स्टाईल एकात्मिक टाउनशिप आहे. निवासी, व्यावसायिक, आरोग्यसेवा, शिक्षण आणि मनोरंजन यांचा समन्वय साधून ही टाउनशिप भारतातील सर्वात प्रतिष्ठित टाउनशिप ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी