

मुंबई, 3 डिसेंबर, (हिं.स.)। विवोने भारतीय बाजारात आपली नवीन प्रीमियम स्मार्टफोन सिरीज विवो एक्स 300 सादर करताना तंत्रज्ञानप्रेमींसाठी आकर्षक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या सिरीजअंतर्गत दोन मॉडेल्स विवो एक्स 300 आणि विवो एक्स 300 प्रो सादर करण्यात आले आहेत. ही दोन्ही डिव्हाइसेस मागील एक्स200 सिरीजचे अपग्रेडेड व्हर्जन असून डिझाइन, कॅमेरा आणि परफॉर्मन्स या तिन्ही गोष्टींमध्ये अपग्रेड घेतात आहे.
किंमतींच्या बाबतीत विवो एक्स 300 ची सुरुवातीची किंमत 75,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा मॉडेल तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तर एक्स300 प्रो सिंगल व्हेरिएंट 1,09,999 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. तर झाईस 2.35x टेलीफोटो एक्सटेंडर किटची किंमत 18,999 रुपये आहे. या सर्व उत्पादनांची प्री-बुकिंग विवो इंडियाच्या ई-स्टोअर, ई-कॉमर्स आणि ऑफलाइन स्टोअर्सवर सुरू झाली असून विक्री 10 डिसेंबरपासून उपलब्ध होईल.
नवीन सिरीजमध्ये मीडियाटेकचा डायमेंसिटी 9500 हा अत्याधुनिक चिपसेट देण्यात आला आहे, जो मल्टीटास्किंग, प्रो-लेव्हल फोटो-व्हिडिओ रेंडरिंग आणि हाय-एंड गेमिंगसाठी विशेषतः डिझाइन करण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये LPDDR5X रॅम आणि UFS 4.1 स्टोरेज असल्याने गती आणि स्थिरता अधिक मिळते. विवोने या सिरीजसोबत झाईस 2.35x टेलीफोटो एक्सटेंडर किटही सादर केले आहे, ज्यामुळे फोटोग्राफीचा अनुभव आणखी व्यावसायिक बनतो.
कॅमेराच्या बाबतीत एक्स 300 सिरीज अपेक्षेपेक्षा जास्त सक्षम ठरते. विवो एक्स300 मध्ये 200MP OIS प्रायमरी सेन्सरसह 50MP वाइड-अँगल आणि 50MP टेलीफोटो कॅमेरा मिळतो. तर एक्स 300 प्रो मॉडेलमध्ये 50MP सोनी LYT-828 प्रायमरी सेन्सरसोबत 50MP वाइड-अँगल आणि 200MP टेलीफोटो सेन्सर देण्यात आले आहेत, जे 3.5x ऑप्टिकल झूम आणि CIPA 5.5 स्टेबिलायझेशनला सपोर्ट करतात. दोन्ही फोन झाईस पोर्ट्रेट मोड, एस्ट्रो, लँडस्केप, लाँग एक्सपोजर आणि टेलीफोटो एक्सटेंडर यांसारख्या मोड्ससह प्रोफेशनल पातळीची फोटोग्राफी करण्यास सक्षम आहेत. सेल्फीसाठी समोर 50MP ऑटो फोकस कॅमेरा देण्यात आला आहे.
डिस्प्लेकडे पाहिल्यास, विवो एक्स 300 मध्ये 6.31-इंचाचा 120Hz एमोलेड पॅनल असून जेनसेशन XT कोर ग्लासची सुरक्षितता मिळते. एक्स 300 प्रो मध्ये 6.78-इंचाचा LTPO एमोलेड 120Hz डिस्प्ले देण्यात आला असून HDR10+ आणि डॉल्बी व्हिजन सपोर्टमुळे मल्टीमीडिया अनुभव अधिक आकर्षक होतो. दोन्ही मॉडेल्स 94% पेक्षा जास्त स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह स्लिम आणि आधुनिक लुक प्रदान करतात.
बॅटरीच्या बाबतीतही विवोने उदार हात दाखवला आहे. एक्स 300 मध्ये 6040mAh बॅटरी आणि 90W फ्लॅश चार्जिंग असून एक्स 300 प्रो मध्ये मोठी 6510mAh बॅटरी, 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. त्यामुळे मोठ्या वापरामध्येही बॅटरी जास्त वेळ टिकण्याची हमी मिळते.
सुरक्षिततेसाठी दोन्ही फोनमध्ये 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच IP68 आणि IP69 रेटिंगमुळे हे फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी एनएफसी, वाय-फाय ७, ब्लूटूथ ६.०, यूएसबी ३.२ जेन१, नेव्हिक आणि ई-सिम सपोर्ट मिळतो.
बाजारात हा फ्लॅगशिप सिरीज ओप्पो फाइंड X9, सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा, शाओमी 17 प्रो मॅक्स आणि आयफोन 17 सिरीजशी जोरदार स्पर्धा करणार आहे. कॅमेरा आणि परफॉर्मन्सचा संगम असलेली ही सिरीज प्रिमियम सेगमेंटमध्ये वापरकर्त्यांसाठी नवा पर्याय ठरणार हे निश्चित आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule