
मुंबई, 3 डिसेंबर (हिं.स.)। महिंद्राने जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम असलेली स्पेशल एडिशन इलेक्ट्रिक एसयूवी बीई 6 फॉर्म्युला ई एडिशन सादर केली असून मोटरस्पोर्ट प्रेमींसाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. भारतीय मोटरस्पोर्टची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली ही एसयूवी भारताच्या रेसिंग वारशाला इलेक्ट्रिक स्वरूपात पुढे नेणारी ठरते. बीई 6ची ही खास आवृत्ती भारतातील रेसिंग कल्चरला अचूक, आक्रमक आणि मोटरस्पोर्ट-प्रेरित डिझाइनसह रस्त्यांवर आणते.
या स्पेशल एडिशनमध्ये दोन व्हेरिअंट्स असून एफई 2 ची किंमत 23.69 लाख रुपये आणि अतिरिक्त फीचर्स असलेल्या एफई 3 ची किंमत 24.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बुकिंग 14 जानेवारी 2026 पासून सुरू होणार असून डिलिव्हरी 14 फेब्रुवारीपासून दिली जाईल. पहिल्या 999 ग्राहकांना विशेष लाभांचे पॅकेज तसेच तीन भाग्यवान विजेत्यांना लंडन ई-प्रिक्स 2026 पाहण्याची संधी मिळणार आहे. भारताचा वेगवान रेस ड्रायव्हर्सपैकी एक आणि एफआईए फॉर्म्युला 2 विजेता कुश मैनी हे या मॉडेलचे ब्रँड अॅम्बेसेडर राहतील.
बीई 6 फॉर्म्युला ई एडिशनचे बाह्य डिझाइन पूर्णपणे सर्किट-प्रेरित असून सिग्नेचर फ्रंट बंपर, सर्क्युलर प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, ग्लॉस ब्लॅक फिनिश, फायरस्टॉर्म ऑरेंज अॅक्सेंट्स, चार आकर्षक रंग पर्याय, रेसट्रॅक-प्रेरित R20 अलॉय व्हील्स, ऑरेंज ब्रेक कॅलिपर्स, ड्युअल स्पॉयलर्स, 12 स्ट्राईप ग्राफिक्स, ‘महिंद्रा फॉर्म्युला ई’ सिरेमिक ब्रँडिंग आणि विशेष डेकल्स यामुळे एसयूव्हीचे व्यक्तिमत्त्व अधिक दमदार दिसते. संपूर्ण डिझाइन महिंद्राच्या जागतिक फॉर्म्युला ई वारशाची झलक देणारे आहे.
इंटीरियर ‘रेस-रेडी कॉकपिट’ संकल्पनेवर आधारित असून फायरस्टॉर्म ऑरेंज थीम, एफआयए आणि फॉर्म्युला ई लोगो, कस्टम स्टार्टअप अॅनिमेशन, फॉर्म्युला ई प्रेरित इंजिन साउंड्स, स्पोर्टी सीटबेल्ट ब्रँडिंग, ट्रान्सलुसेंट डोअर इन्सर्ट्स, रेस-कारसारखा स्टार्ट/स्टॉप बटण फ्लॅप आणि डायनॅमिक ऑडिओ पॅनेल्स यामुळे कारमध्ये पाऊल टाकताच रेसिंग अनुभव मिळतो.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह बिझनेस प्रेसिडेंट आर. वेलुसामी यांनी सांगितले की बीई6 आधीच भविष्यवादी डिझाइन आणि इलेक्ट्रिक ओळख यांसाठी लोकप्रिय आहे, आणि ग्राहकांच्या मागणीवरून तयार केलेली फॉर्म्युला ई एडिशन भारतीय रेसिंग संस्कृतीला एक नवीन आयकॉन देईल. मोटरस्पोर्ट हा आता तरुणांसाठी केवळ छंद नसून लाइफस्टाइल स्टेटमेंट बनत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनीकांत गोल्लगुंटा यांनी स्पष्ट केले. चीफ डिझाइन ऑफिसर प्रताप बोस यांनी या एडिशनचे डिझाइन ‘रेसिंगची सरळ घोषणा’ असे वर्णन केले असून ही एसयूव्ही महिंद्राच्या रेसिंग परंपरेचा उत्सव असल्याचे त्यांनी सांगितले.
महिंद्राची बीई 6 फॉर्म्युला ई एडिशन ही भारतीय रस्त्यांवरील इलेक्ट्रिक परफॉर्मन्सची नवी ओळख बनण्याच्या दिशेने मोठे पाऊल मानली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule