प्राजक्ता गायकवाडचे कन्यादान वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर यांच्या हस्ते संपन्न
मुंबई, 3 डिसेंबर, (हिं.स.)। ‘येसूबाई साहेब’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. कला, सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा अध
प्राजक्ता गायकवाडचे कन्यादान वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर यांच्या हस्ते


मुंबई, 3 डिसेंबर, (हिं.स.)। ‘येसूबाई साहेब’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. कला, सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा अधिक वाढली.

प्राजक्ताचा विवाह हडपसर येथील सुप्रसिद्ध उद्योजक शंभूराजे खुटवड यांच्याशी वैदिक पद्धतीने झाला. भारतातील सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ व ज्योतिषी यांच्या हस्ते तसेच निर्माते व कलाकार श्री पिंपळकर यांच्या हस्ते भावपूर्ण कन्यादान विधी पार पडला. यापूर्वी त्यांनी प्राजक्ताच्या वडिलांची भूमिका काही चित्रपटांमध्ये साकारल्याने “चित्रपटातील नाते वास्तवात उतरण्याचा आनंद अवर्णनीय आहे” असे ते भावूक स्वरात म्हणाले.

विधी दरम्यान श्री व सौ. पिंपळकर यांचे डोळे पाणावले. “काही नाती रक्ताच्या पलीकडे जाऊन ईश्वराच्या अधिष्ठानाने जुळतात” असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. प्राजक्ताचे आई-वडील तसेच मामा-मामी यांनीही कन्यादान विधीत सहभाग घेतला. “प्राजक्ताच्या रूपात आम्हाला लेकरू लाभले,” असे सौ. अश्विनी पिंपळकर यांनी सांगितले.

पारंपरिक वैदिक वातावरणात दिमाखदाररीत्या पार पडलेल्या या विवाहसोहळ्यासाठी नवदांपत्यावर सर्वत्रून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande