पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अल्मोडा बस अपघाताबद्दल शोक व्यक्त
नवी दिल्ली, ३० डिसेंबर (हिं.स.) : उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला. पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) अधिकृत एक्स हँडलवरून प्रसिद्ध झालेल्या संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, ३० डिसेंबर (हिं.स.) : उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला.

पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) अधिकृत एक्स हँडलवरून प्रसिद्ध झालेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो.

उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील भिकियासैन भागात मंगळवारी सकाळी सिलापाणीजवळ बस खोल दरीत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आणि १२ जण जखमी झाले आहेत.

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande