लातूर-राज प्रतिष्ठानच्या वतीने ५० क्षयरुग्णाना फूड बास्केट किट वाटप
लातूर, 30 डिसेंबर (हिं.स.)प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियान मोहिमे अंतर्गत राज प्रतिष्ठानच्या वतीने ५० क्षयरुग्णाना फूड बास्केट किट वाटप करण्यात आले. येथील जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
लातूर-राज प्रतिष्ठानच्या वतीने ५० क्षयरुग्णाना फूड बास्केट किट वाटप


लातूर, 30 डिसेंबर (हिं.स.)प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियान मोहिमे अंतर्गत राज प्रतिष्ठानच्या वतीने ५० क्षयरुग्णाना फूड बास्केट किट वाटप करण्यात आले. येथील जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड होत्या. आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ. अभय कदम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुमित्रा तांबारे, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. अविनाश देशमुख, राज प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. हर्षवर्धन राऊत आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. गायकवाड यांनी यांनी राज प्रतिष्ठानच्या कार्याचे व सामाजिक बांधिलकीचे कौतूक केले. क्षयरुग्णांनी नियमीत सकस आहार घ्यावा. वेळेवर औषधे घ्यावीत, असे सांगत आपण स्वत: निक्षय मित्र बणून ५० क्षयरुग्णांना फुट बॉस्केट देणार असल्याचे यावेळी सांगितले. डॉ. ताबांरे यांनी क्षयरुग्णांनी घ्यावयाच्या काळजीबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. अभय कदम यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतूक करीत क्षयरुग्णांना फुड बास्केट देण्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन आभार प्रदर्शन डॉ. बाळासाहेब जाधव यांनी केले. आभार डॉ. हर्षवर्धन राऊत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी व कर्मचा-यानी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande