
नांदेड, 30 डिसेंबर (हिं.स.)। बारड येथीलजिल्हा परिषद हायस्कूल माध्यमिक शाळेने शैक्षणिक उपक्रमांसोबत क्रीडा क्षेत्रातही यश मिळवले. शाळेची विद्यार्थिनी श्रद्धा बाबूराव कुलुपवाड हिची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली. याबद्दल बारड जिल्हा परिषद शाळेचा क्रीडा क्षेत्रातील तुरा उंचावला आहे.
अहिल्यानगर (शेवगाव) येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने
आयोजित शालेय राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी पार पडली. या चाचणीत लातूर विभागातून नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रद्धा कुलुपवाड हिने उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून श्रद्धा कुलुपठाड ही लातूर विभाग व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे, बाळासाहेब देशमुख, मुख्याध्यापिका शुभांगिनी तळणकर, मुख्य क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर, संघटनेचे सचिव आनंदा कांबळे तसेच क्रीडा शिक्षक बाबूरात कुलुपताड आदींनी कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis