
मालेगाव, 30 डिसेंबर, (हिं.स.)। मालेगाव महानगरपालिकेमध्ये अखेर शेवटच्या दिवशी महायुती कुठली असून या ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष असलेले तिन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार आहे.
मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास उरले असताना भाजप- शिवसेना शिंदे गट - राकपा युतीबाबत स्पष्टता दिसून येत नसल्याकारणाने . यातच युती करण्यावरून भाजपमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे . मालेगावात भाजपचे दोन गट पडले असून, युतीबाबत नेत्यांनी विरोध दर्शवला आहे.
मालेगावमध्ये भाजप व शिवसेना शिंदे गटाची युती व्हावी, अशी अपेक्षा वरिष्ठ पातळीवरून व्यक्त झाली होती. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये स्थानिक स्तरावर चर्चा व बैठका पार पडल्याची माहिती आहे. परंतु, भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, महानगरप्रमुख देवा पाटील यांच्यासह काही पदाधिकारी युती करण्याच्या बाजूने आहेत. बंडूकाका बच्छाव, अद्वय हिरे व सुनील गायकवाड यांनी युतीला कडाडून विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत युती न झाल्याने या ठिकाणी शिवसेना शिंदे गट भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती तुटली आहे
चौकट
मालेगावमध्ये भाजपची ताकद आज वाढलेली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पक्ष उभा आहे. अशा परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाशी युती केल्यास अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी, हीच आमची ठाम भूमिका आहे.– अद्वय हिरे, भाजप नेते
यंदा मालेगाव महापालिकेची निवडणूक भाजपसाठी अनुकूल आहे. अनेक जुने निष्ठावान कार्यकर्ते निवडून येण्याच्या स्थितीत आहेत. मात्र, युती केल्यास त्यांची संधी हिरावली जाईल आणि पक्षाचे नुकसान होईल. त्यामुळे युती झाल्यास मी स्वतः निवडणूक लढवणार नाही.’– सुनील गायकवाड, माजी नगरसेवक
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV