रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे ९ जानेवारीपासून ब्रह्मानंद ग्राहक पेठ
रत्नागिरी, 31 डिसेंबर, (हिं. स.) : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या वतीने येत्या ९ ते ११ जानेवारी या ब्रह्मानंद ग्राहक पेठ आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरीत नाचणे-साळवी स्टॉप लिंक रोडवर वेधशाळेसमोर असलेल्या श्रीमान यशवंत हरी गोखले भवनात ही ब्
रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे ९ जानेवारीपासून ब्रह्मानंद ग्राहक पेठ


रत्नागिरी, 31 डिसेंबर, (हिं. स.) : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या वतीने येत्या ९ ते ११ जानेवारी या ब्रह्मानंद ग्राहक पेठ आयोजित करण्यात आली आहे.

रत्नागिरीत नाचणे-साळवी स्टॉप लिंक रोडवर वेधशाळेसमोर असलेल्या श्रीमान यशवंत हरी गोखले भवनात ही ब्रह्मानंद ग्राहक पेठ भरणार आहे. तिन्ही दिवशी सायंकाळी ४ ते ९ या वेळेत ग्राहक पेठ भरेल. ग्राहक पेठेमध्ये आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री आणि सोबतच चटकदार पदार्थांची रेलचेल असेल. अधिक माहितीसाठी प्रसाद पटवर्धन (९४२०६६०५९६) यांच्याशी संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande