
नाशिक, 31 डिसेंबर (हिं.स.)।
- केंद्र सरकारने नासिक अक्कलकोट अशा सहा पदरी कॅरीडोरला मंजुरी दिली असून याबाबतची अधिकृत घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टद्वारे केली आहे.
नाशिक मधून पुन्हा एक नवीन कॅलेंडर जाणार असून त्याबाबतची घोषणा आज बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर करण्यात आली आहे याबाबत अधिकृत माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वरून घोषित केले आहे. यापूर्वी नाशिक मधून सुरत चेन्नई या महामार्गाबरोबरच समृद्धी महामार्ग हा देखील झालेला आहे आणि आता पालघर मध्ये तयार होत असलेल्या नवीन वाढवण बंदरासाठी म्हणून त्र्यंबक पालघर, घोटी त्र्यंबक पालघर अशा स्वरूपाचा कॅरेडोर केला जात आहे या संपूर्ण महामार्गाला नाशिक - मुंबई ,समृद्धी महामार्ग आणि नाशिक- पुणे महामार्ग जोडले जात आहे.
यानंतर आता केंद्र सरकारने नाशिक अक्कलकोट या नवीन कॅरिडॉर मार्गाला मंजुरी दिली असून हा मार्ग नाशिक पासून सुरु होईल आणि थेट अक्कलकोट पर्यंत जाणार आहे. या महामार्गाच्या लगत लॉजिस्टिक पार्क तसेच इतर सुविधा देखील तयार करून रोजगाराला संधी मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV