संजय राऊत यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
मुंबई, 31 डिसेंबर (हिं.स.) - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना बुधवारी अज्ञात व्यक्तीने बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. अधिक म
संजय राऊत धमकी


मुंबई, 31 डिसेंबर (हिं.स.) - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना बुधवारी अज्ञात व्यक्तीने बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

अधिक माहिती अशी की, संजय राऊत यांच्या भांडूप येथील 'मैत्री' या बंगल्याबाहेर उभी असलेली 'वॅगन आर' कार बऱ्याच दिवसापासून एकाच जागी उभी आहे. त्यामुळं या कारवर बरीच धूळही बसली आहे. या धूळ बसलेल्या काचेवर कोणीतरी संजय राऊत यांना धमकी देणारा संदेश लिहिला आहे. 'आज हंगामा होगा! आज रात १२.०० am बॉम्ब ब्लास्ट होगा' असं या संदेशात म्हटलं आहे. हा प्रकार पाहिल्यानंतर सर्वात आधी राऊत यांच्या सहकाऱ्यांनी याचे फोटो काढले आणि ते पोलिसांना पाठवले. त्यानंतर पोलीस बॉम्ब शोधक पथकासह श्वान पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी याची पडताळणी केली. मात्र अद्याप कुठलीही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, हा धमकीचा संदेश स्पष्टपणे दिसत असल्यानं पोलिसांनी खबरदारी म्हणून प्राथमिक तपास सुरु केला आहे. हा संदेश हिंदीत लिहिला असल्यानं ते लिहिणारी व्यक्ती कोण असेल? याचा तपास केला जात आहे. पण हे कोणी लिहिलं? कशासाठी लिहिलं? याची कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

यापूर्वीही राऊत यांच्या बंगल्याबाहेर काही अज्ञात लोकांनी बाईकवरुन येऊन बंगल्याचे फोटो काढून रेकी केली होती. दहा मोबाईल कॅमेऱ्यांमधून ही रेकी करण्यात आली होती. या घटनेचे सीसीटीव्ही देखील समोर आले होते. विशेष म्हणजे या प्रकाराची चर्चा विधानसभेतही झाली होती. पण त्याचवेळी राऊतांच्या घराबाहेर असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता ते बाईकवरुन फरार झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande