केंद्र सरकारकडून निमेसुलाइड औषधाच्या उत्पादनावर बंदी
नवी दिल्ली , 31 डिसेंबर (हिं.स.)।केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध वेदनाशामक औषध ‘निमेसुलाइड’ वर बंदी घातली आहे. ही बंदी 100 मि.ग्रॅमपेक्षा अधिक डोस असलेल्या नायमेसुलाइड गोळ्यांवर लागू होणार आहे. आरोग्यविषयक धोके लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घे
केंद्र सरकारकडून वेदनाशामक औषध निमेसुलाइडच्या उत्पादनावर बंदी


नवी दिल्ली , 31 डिसेंबर (हिं.स.)।केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध वेदनाशामक औषध ‘निमेसुलाइड’ वर बंदी घातली आहे. ही बंदी 100 मि.ग्रॅमपेक्षा अधिक डोस असलेल्या नायमेसुलाइड गोळ्यांवर लागू होणार आहे. आरोग्यविषयक धोके लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे. ड्रग टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी बोर्ड यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे की, 100 मि.ग्रॅमपेक्षा अधिक डोस असलेल्या निमेसुलाइड औषधांच्या वापरामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच यांचे सुरक्षित पर्याय आधीच बाजारात उपलब्ध आहेत.मंत्रालयाने सांगितले आहे की, 100 मि.ग्रॅमपेक्षा जास्त प्रमाणातील निमेसुलाइड असलेली तोंडी औषधे मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे जनहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, ही बंदी ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, 1940 मधील कलम 26A अधिनियमाअंतर्गत असून तात्काळ प्रभावाने लागू होणार आहे. या निर्णयानुसार, देशभरात निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणातील निमेसुलाइड असलेल्या तोंडी औषधांचे उत्पादन, विक्री आणि वितरण पूर्णतः बंद राहील.

याआधी 2011 मध्ये, आरोग्य मंत्रालयाने 12 वर्षांखालील मुलांसाठी निमेसुलाइडच्या वापरावर बंदी घातली होती. सरकारने स्पष्ट आदेश दिला होता की, 12 वर्षांखालील मुलांच्या वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनमध्ये निमेसुलाइड हे औषध लिहिले जाणार नाही, कारण त्याचे सेवन मुलांसाठी हानिकारक ठरू शकते. अनेक देशांमध्ये या औषधाच्या वापरावर आधीपासूनच बंदी आहे.भारताआधी युरोपमधील अनेक देशांमध्ये निमेसुलाइड गोळ्यांवर पूर्णपणे बंदी आहे. फिनलंड, स्पेन, आयर्लंड आणि बेल्जियम या युरोपीय देशांनी 2007 मध्येच या औषधावर बंदी घातली होती. याशिवाय कॅनडा, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंगडम (यूके) येथेही निमेसुलाइडच्या वापरावर प्रतिबंध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande