अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वी बीड मध्ये अतिक्रमणही हटवले, दौरा रद्द
बीड, 31 डिसेंबर (हिं.स.)। बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवस शहरात येणार होते. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. शहरातील स्वच्छतेसह जालना रोड, बसस्थानक, सुभाष रोड, नगर रोड परिसरातील अतिक्रमणही हटवण्यात आले. मात्र,
अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वी बीड मध्ये अतिक्रमणही हटवले, दौरा रद्द


बीड, 31 डिसेंबर (हिं.स.)।

बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवस शहरात येणार होते. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. शहरातील स्वच्छतेसह जालना रोड, बसस्थानक, सुभाष रोड, नगर रोड परिसरातील अतिक्रमणही हटवण्यात आले. मात्र, अजित पवारांचा दौरा रद्द झाला.

अजित पवारांचा दौरा जाहीर होताच शहरातील स्वच्छतेची यंत्रणा अचानक सक्रिय झाली. ते ज्या मार्गावरून जाणार, त्या रस्त्यांवरील कचरा हटवण्यात आला. नाल्या साफ केल्या गेल्या, चौकाचौकात झाडू फिरवला गेला. उपमुख्यमंत्री पवार यांना कोणत्याही ठिकाणी समस्या दिसू नये यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले . ठिकठिकाणी अतिक्रमण देखील काढण्यात आले मात्र ऐन वेळेला निवडणुकीच्या कार्यकाळात अजित पवार यांचा दौरा रद्द करण्यात आला अशी माहिती मिळत आहे

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande