
सोलापूर, 31 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार यांच्या उपक्रमांतर्गत सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC) तथा प्रादेशिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र (RRTC)मुंबई व सोलापूतील ज्येष्ठ नागरिक संघांची शिखर समिती यांचे संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.पहिल्या दिवशी, आदित्य नगर सांस्कृतिक सभागृह विजापूर रोड, येथे 'ज्येष्ठ नागरिकांचे आहार व पोषण'या विषयावर पार पडलेल्या कार्यशाळेसाठी आहारतज्ञ तस्लिम चौधरी, देविका डोंगरेकर आदी तज्ञांनी मार्गदर्शन केले.दुसऱ्या दिवशी, दमाणी ब्लड बँक डफरिन चौक, येथे 'डिजिटल साक्षरता' विषयावर सायबर क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, प्रा. डॉ. प्रसन्न माधवराव गव्हाणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे, शिल्प निदेशक संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक विजय भांगे, संगणक अभियंता- सायबर तज्ञ अविनाश पाटील, कॉन्स्टेबल अश्विनी लोणी. इ. मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तर कर्णिक नगर - एकता नगर येथील सत्रात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुरेश गायकवाड, मानसोपचार तज्ञ डॉ. निहार दिलीप बुर्ट, समाजसेविका डॉ. अपर्णा सुभाष कल्याणकर या मान्यवरांनी 'ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य आणि मालमतेचे संरक्षण' या विषयावर सखोल माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड