“ताली राजा को, तो गाली भी राजा को…” भाजपच्या अंतर्गत राड्यावर सुनील देशमुखांची टीका
अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून अमरावती भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावावर काँग्रेसचे माजी मंत्री व माजी आमदार सुनील देशमुख यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या धक्काबुक्
“ताली राजा को, तो गाली भी राजा को…” भाजपच्या अंतर्गत राड्यावर सुनील देशमुखांची घणाघाती टीका


अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.)।

महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून अमरावती भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावावर काँग्रेसचे माजी मंत्री व माजी आमदार सुनील देशमुख यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या धक्काबुक्की आणि गोंधळावर भाष्य करताना सुनील देशमुख यांनी भाजपवर सडकून टीका केली.

“ताली राजा को मिलती है, तो गाली भी राजा को ही मिलेंगी,” असे म्हणत त्यांनी भाजपला लक्ष्य केले. “ज्या लोकांना भाजपने धर्माच्या नावावर पेटवले, ते लोक शांत कसे बसतील? ज्याआगीला भाजपनेच हवा दिली, त्याच आगीत आता भाजपचेच हात जळत आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.सुनील देशमुख म्हणाले की, भाजपने गेल्या काही वर्षांत सातत्याने धार्मिक भावना भडकवण्याचे राजकारण केले. त्याचा परिणाम आता पक्षालाच भोगावा लागत आहे. “सत्तेसाठी आणि मतांसाठी समाजात द्वेष, असंतोष आणि आक्रमकता पसरवली. आज तीच मानसिकता पक्षाच्या अंतर्गत राजकारणात उफाळून येत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

तिकीट नाकारल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जाब विचारणे, तसेच राडा घालणे ही गंभीर बाब असल्याचे देशमुख यांनी नमूद केले. “हा प्रकार केवळ तिकीट न मिळाल्याचा नाही, तर भाजपच्या आत साचलेल्या असंतोषाचा स्फोट आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाते, काही ठराविक लोकांनाच संधी दिली जाते, त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे,” असे ते म्हणाले.भाजपने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगत देशमुख म्हणाले, “लोकशाहीत सत्ता येते- जाते. पण समाजात जे विष पेरले जाते, त्याचे परिणाम दूरगामी असतात. आज अमरावतीत जे घडते आहे, ते भाजपच्या चुकीच्या राजकारणाचा परिणाम असल्याचे हि डॉ.सुनील देशमुख म्हणालेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande