शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रोहा तालुक्यात ३ जानेवारीला मोजणी मोहिम
रायगड, 31 डिसेंबर (हिं.स.)। पावसाळी महिन्यांमध्ये (जून ते ऑक्टोबर 2025) सतत पावसामुळे रोहा तालुक्यात मोजणी काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे उप अधीक्षक भूमि अभिलेख रोहा कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात मोजणी प्रकरणे प्रलंबित राहिली. यांचा जलद निपटारा
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रोहा तालुक्यात मोजणी मोहिम ३ जानेवारीला


रायगड, 31 डिसेंबर (हिं.स.)। पावसाळी महिन्यांमध्ये (जून ते ऑक्टोबर 2025) सतत पावसामुळे रोहा तालुक्यात मोजणी काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे उप अधीक्षक भूमि अभिलेख रोहा कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात मोजणी प्रकरणे प्रलंबित राहिली. यांचा जलद निपटारा करण्यासाठी 3 जानेवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार व उपसंचालक भूमि अभिलेख कोंकण प्रदेश मुंबई अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड यांच्या देखरेखीखाली या १२६ प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा एका दिवसात केला जाणार आहे. सर्व प्रकरणांत मोजणी नोटीस संबंधित अर्जदार व हितसंबंधितांना पाठविण्यात आल्या असून, त्यांना दि. 03 जानेवारी रोजी उपस्थित राहून जमिनींची मोजणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड सुनिल इंदलकर यांनी केले आहे.

नोव्हेंबर 2025 अखेर रोहा कार्यालयाकडे एकूण ३८९ मोजणी प्रकरणे शिल्लक होती. त्यापैकी २२६ मुदतबाह्य, तीन महापेक्षा अधिक कालावधीवर प्रलंबित, ३६ प्रकरणांत मोजणी पूर्ण झाली आहे, तर ६४ प्रकरणांसाठी डिसेंबर 2025 मध्ये मोजणी तारखा निश्चित झाल्या होत्या. उर्वरित १२६ मुदतबाह्य प्रकरणांवर या विशेष मोहिमेत लक्ष केंद्रीत केले जाईल.

या मोहिमेमुळे तालुक्यातील प्रलंबित प्रकरणांचा मोठ्या प्रमाणावर निपटारा होईल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, भविष्यातील मोजणी प्रकरणांसाठी लवकर तारखा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande