मुख्यमंत्री फडणवीस यांची 5 जानेवारीला परभणीत सभा
परभणी, 31 डिसेंबर (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परभणी महानगरपालिकेंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 5 जानेवारी रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 5 जानेवारी रोजी परभणीत सभा   :  महापालिका निवडणूक प्रचार


परभणी, 31 डिसेंबर (हिं.स.)।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परभणी महानगरपालिकेंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 5 जानेवारी रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा होत आहे. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी व निवडणूक रिंगणातील अधिकृत उमेदवारांनी या प्रचार सभेच्या यशस्वीतेकरीता या पाच दिवसात मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याचा संकल्प सोडला आहे.भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांच्या या संभाव्य दौर्‍यासह सभेबाबत संदेश प्राप्त झाल्याबरोबर या जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर, ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह महानगर जिल्हाप्रमुख शिवाजी भरोसे, डॉ. केदार खटींग, प्रमोद वाकोडकर व अन्य पदाधिकार्‍यांनी या सभेच्या स्थळासह नियोजनाच्या दृष्टीने चर्चा सुरु केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande