
मुंबई, 31 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
उद्यापासून सुरु होत असलेल्या २०२६ या नव्या वर्षानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो.
अन्नदाता शेतकरी बांधवांना नववर्षानिमित्त विशेष शुभेच्छा देतो. आगामी वर्ष सर्वांसाठी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, ही प्रार्थना.
यानिमित्त विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी दृढ संकल्प करुया, असे आवाहन राज्यपाल देवव्रत यांनी आपल्या संदेशातून केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर