अटकेतील आरोपींची ‘कुंडली’ आता अनिवार्य
अमरावती, 5 डिसेंबर (हिं.स.) राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शना-खाली २७ नोव्हेंबर रोजी कारागृह प्रशासन आणि कायदा अंमल -बजावणी संस्थांमधील गुप्तचर सामायिकरण समितीच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत, विशेष पोलीस मह
अटकेतील आरोपींची ‘कुंडली’ आता अनिवार्य; जेल प्रशासनाला पूर्ण माहिती देणार पोलिस सर्व पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांना सूचना


अमरावती, 5 डिसेंबर (हिं.स.)

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शना-खाली २७ नोव्हेंबर रोजी कारागृह प्रशासन आणि कायदा अंमल -बजावणी संस्थांमधील गुप्तचर सामायिकरण समितीच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज कुमार शर्मा यांनी स्पष्ट सूचना दिल्या की जेव्हा एनडीपीएस प्रकरणांमध्ये अटक केलेले कुख्यात संघटित गुन्हेगार आणि हाय-प्रोफाइल आरोपी न्यायालयीन कोठडी अतर्गत जेलमध्ये रवाना करतात, तेव्हा कारागृह प्रशासनाला त्यांच्या सर्व कारनाम्याची माहिती दिली पाहिजे. यामुळे कारागृह प्रशासनाला आरोपींच्या हिसक आणि स्वभावाची जाणीव होईल. आणि त्यानुसार संबंधित आरोपांवर लक्ष ठेवू शकतील. गुरुवारी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चौहान यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना पत्राद्वारे माहिती दिली. याव्यतिरिक्त, ग्रामीण पोलीस निरीक्षकांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलिसांना काय द्यावे लागेल ?

एनडीपीएस प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या सर्व कुख्यात आणि संघटित गुन्हेगारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल माहिती आणि आरोपींची असुरक्षितता आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यांची माहिती कारागृह प्रशासनाला 'लेखी स्वरूपात देण्यात येईल, जेणेकरून तुरुंग अधिकारी त्यांच्यावर विशेष देखरेख ठेवू शकतील.

अशा आरोपींना हाताळणे कठीण

अनेक आरोपी विविध ड्रग्ज गुन्ह्यांसाठी तुरुंगात प्रवेश करतात, त्यानंतर तुरुंग त्यांच्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रासारखे बनते. अचानक, नशेचे पदार्थ न मिळाल्याने ते कासावीसहोतात. त्यांची तब्येत आणखी बिघडली तर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. हा एक अतिशय चांगला निर्णय आहे. यामुळे सुरुवातीपासूनच आरोपींवर देखरेख ठेवता येते.

. ■ किर्ती चिंतामणी,

तुरुंग अधीक्षक, अमरावती मध्यवर्ती कारागृह.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande