मुंबई , 18 फेब्रुवारी (हिं.स.)।भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या भारतीय संघाच्या पराभवानंतर कडक नियम लागू केले. बीसीसीआयने लागू केलेल्या नियमांमध्ये दौऱ्यादरम्यान कुंटुंबियांच्या सोबतीबाबतही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी नियमानुसार खेळाडूंसोबत कुटुंबातील कोणताही सदस्य दुबईला आलेला नाही. पण आता बीसीसीआय या नियमात खेळाडूंना थोडी सुट दिली आहे, असं समजत आहे. मात्र, त्यातही एक अट घालण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, प्रत्येक दौऱ्यात खेळाडूंना आपल्या कुटुंबियांना सोबत नेता येणार नाही. मोठा दौरा असेल तर १४ दिवस फॅमिलीलासोबत ठेवता येईल, असा उल्लेखही बीसीसीआयच्या नियमावलीत करण्यात आला होता. पण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही दिर्घकाळ चालणारी नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंना बायका पोरांनासोबत नेण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची गोष्ट चांगलीच चर्चेत आली. आता यासंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. आता बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंना थोडी सूट देत एका मॅचसाठी फॅमिलीला बोलवण्याची परवानगी दिल्याचे समजते. खेळाडू फक्त एका सामन्यापुरतेच फॅमिलीसोबत राहू शकतात. त्यासाठीही एक अट पाळावी लागेल.ती म्हणजे कोणत्या मॅचसाठी कुटुंबातील मंडळी उपस्थितीत राहणार आहेत, याची पूर्व कल्पना खेळाडूनं बीसीसीआयला देणं अपेक्षित आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ १५ फेब्रुवारीलाच दुबईत पोहचला आहे. बीसीसीआयच्या नियमावलीची पालन करत कुटुंबियांशिवायच संघातील खेळाडू दुबईला रवाना पोहचल्याचे पाहायला मिळाले. आता बीसीसीआयने एक दिवस सामना पाहण्यासह खेळाडूंना कुटुंबियांसोबत राहण्याची परवानगी दिलीये. आता खेळाडूंचे कुटुंब भारत-पाक मॅच बघायला येणार की, फायनल ते बघण्याजोगे असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode