इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीचा अविराज गावडे मॅन ऑफ दि मॅच
रत्नागिरी, 12 मे, (हिं. स.) : इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत खेळण्यासाठी गेलेल्या रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याने पहिल्याच कौंटी स्पर्धेच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. मिडलसेक्स संघाकडून खेळताना त्याने पदार्पणातील पहिल्याच सामन्यामध्ये मॅन ऑफ दि
अविराज गावडे


रत्नागिरी, 12 मे, (हिं. स.) : इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत खेळण्यासाठी गेलेल्या रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याने पहिल्याच कौंटी स्पर्धेच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. मिडलसेक्स संघाकडून खेळताना त्याने पदार्पणातील पहिल्याच सामन्यामध्ये मॅन ऑफ दि मॅचचा किताब पटकावून सगळ्यांचे लक्ष वेधले. मिडलसेक्स संघाचा युथ विंग संघाबरोबर सामना झाला.

मिडलसेक्स संघातून खेळताना अविराज याने ३४ बॉलमध्ये ४२ रन्स काढत गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामध्ये त्याचे ७ चौकार होते. तसेच त्याने गोलंदाजी करताना ९ ओव्हर्स टाकल्या. केवळ ३६ रन्स देऊन दोन बळी घेतले. अविराज याने क्षेत्ररक्षण करतानाही चमकदार कामगिरी केली. त्याने २ अप्रतिम झेल घेत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.

अविराज याच्या अष्टपैलू खेळाचा विचार करत अविराजला मॅन ऑफ दि मॅचचा किताब देण्यात आला. अविराजच्या कामगिरीबद्दल मिडलसेक्स संघाच्या पदाधिकार्‍यांनी अविराजच्या लेगस्पिन बॉलिंगचे विशेषतः गुगलीचे कौतुक केले. तसेच त्याच्या तंत्रशुद्ध बॅटिंगचीही दखल घेतली. यामुळे यापुढील अनेक सामन्यातही अविराज चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande