सिंधुदुर्ग, 12 मे (हिं.स.)। महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेन आणि सिंधुदुर्ग बॅडमिंटन गृपच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ मध्ये कोकण विभागस्तरीय कनिष्ठ गटाची कोकणरत्न बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाली तीन दिवस सुरु असलेल्या या स्पर्धेत ठाणे, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधून सुमारे १०० स्पर्धक सहभागी झाले होते. वय वर्षे ११, १३ आणि १५ या वयोगटातील स्पर्धकांसाठी हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १३ वर्ष वयोगटातून महाराष्ट्रातला नम्बर एकचा सीडेड खेळाडू रोहित जाधव हा सहभागी झाला होता. त्याने १३ वर्षाखालील स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. तर ११ वर्ष गटात मुलांमधून ठाण्याचा विहान गायकवाड, १५ वर्ष गटातून पालघरच्या प्रणव सामंत, १५ वर्ष गटात मुलींमधून सिंधुदुर्गची शरयू चुबे तर १५ वर्ष वयोगटात दुहेरीमध्ये पालघरचा प्रणव सामंत आणि सिंधुदुर्गचा साईराज सामंत या जोडीने विजेतेपद पटकावलं.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग बॅडमिंटन गृपच्या वतीने कुडाळमध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉल मध्ये कोकणरत्न बॅडमिंटन टूर्नामेंटचे आयोजन करण्यात होत. त्या स्पर्धेच्या विविध गटातल्या फायनल राउंड झाल्या. वय वर्षे ११, १३ आणि १५ या वयोगटातील स्पर्धकांसाठी हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कोकण विभागातून सुमारे १०० स्पर्धक सहभागी झाले होते. अशा प्रकारची सिंधुदुर्गमध्ये होणारी हि पहिलीच स्पर्धा असल्यानं स्पर्धेला फार चांगला प्रतिसाद लाभला. पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधून मानांकनप्राप्त स्पर्धकांचा सहभाग हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरले. पंच आणि खेळाडूंचे रांगेत बॅडमिंटन कोर्टमधे येणे, टॉस या साऱ्या गोष्टी मोठ्या स्पर्धांची आठवण करून देत होत्या. त्यामुळे एक प्रकारचा दर्जा या स्पर्धेला प्राप्त झाला होता.
१३ वर्ष वयोगटातून महाराष्ट्रातला प्रथम मानांकनप्राप्त खेळाडू रोहित जाधव हा सहभागी झाला होता. त्याने १३ वर्षाखालील स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावले. त्याने आपला पालघरचाच प्रतिस्पर्धी मल्हार कुडाळकरवर २१-१० आणि २१-०९ ने मात केली. तर ११ वर्ष गटात मुलांमधून ठाण्याचा विहान गायकवाड विजयी झाला त्याने सिंधुदुर्गच्या विनय परब याच्यावर २१-८ आणि २१-१७ अशी मात केली. १५ वर्ष गटातून पालघरच्या प्रणव सामंत याने सिंधुदुर्गच्या साईराज सामंतवर २१-१२, २१-१६ अशी मात करत विजेतेपद पटकावले. १५ वर्ष गटात मुलींमधून सिंधुदुर्गची शरयू चुबे विजेती ठरली तिने ठाण्याच्या विश्रुती नमना हीचा २१-११, २१-९ असा पराभव केला. तर १५ वर्ष वयोगटात दुहेरीमध्ये पालघरचा प्रणव सामंत आणि सिंधुदुर्गचा साईराज सामंत या जोडीने विजेतेपद पटकावले.त्यांनी सिंधुदुर्गच्या हर्षद सानये आणि हर्षल सानये यांचा २१-५, २१-७ असा पराभव केला. मान्यवरांच्या हस्ते या विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना चषक, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. सहभागी खेळाडूंनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून अशा प्रकारच्या स्पर्धात खेळायला मिळाल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
या स्पर्धेसाठी मुख्य रेफ्री म्हणून विजय कोकमठाणकर तर डेप्युटी रेफ्री म्हणून नरेंद्र सावर्डेकर यांनी काम पाहिले. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे आर्यन कदम, मनस्वी हादसे, मनस्वी चोपडे आणि वंशीता यांनी पंच म्हणून काम पाहिले. पहिल्यांदाच सिंधुदुर्गमध्ये अशा प्रकारची स्पर्धा घेण्यात आली आणि त्याला खेळाडूंचा फार चांगला प्रतिसाद मिळाला असे सिंधुदुर्ग बॅडमिंटन ग्रुपचे डॉ. अमोघ चुबे यांनी सांगितले.
--------------
हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी