नाशिकमध्ये अवैध गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा
नाशिक, 18 फेब्रुवारी (हिं.स.) : घरगुती वापराच्या रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई सौरभ लोंढे यांनी फिर्याददिली आहे. त्यात म्हटले, की आरोपी दिलावर का
नाशिकमध्ये अवैध गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा


नाशिक, 18 फेब्रुवारी (हिं.स.) : घरगुती वापराच्या रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई सौरभ लोंढे यांनी फिर्याददिली आहे. त्यात म्हटले, की आरोपी दिलावर कालेखा पठाण (वय ५०) हा कॅनॉल रोड झोपडपट्टी परिसरात गोसावीवाडीकडे जाणाऱ्या रोडच्या डाव्या बाजूस पडक्या घराच्या भिंतीलगत भरलेले घरगुती गॅस सिलिंडर हे रिकाम्या सिलिंडरमध्ये पिस्टन मोटारीच्या सहाय्याने भरत होता. हा गॅस स्वतःच्या फायद्यासाठी काळ्याबाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सहा हजार रुपये किमतीचे दोन, भारतगॅसचे घरगुती वापराचे सिलिंडर, चार हजार रुपये किमतीचे दोन एचपी कंपनीचे सील नसलेले गॅस सिलिंडर व १५ हजार रुपये किमतीचे गॅस भरण्याचे एक पिस्टन मशीन असा २५ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.या प्रकरणी संशयित दिलावर पठाण याच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande