भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून
सोलापूर, 4 फेब्रुवारी, (हिं.स.)। भिशी चालविण्याच्या आर्थिक व्यवहारात झालेल्या वादातून एका वृद्धाला लोखंडी सळईने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील मालेगाव (आर) येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध पोलिसांनी ग
भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून


सोलापूर, 4 फेब्रुवारी, (हिं.स.)। भिशी चालविण्याच्या आर्थिक व्यवहारात झालेल्या वादातून एका वृद्धाला लोखंडी सळईने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील मालेगाव (आर) येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अन्य एका अल्पवयीन मुलाचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सुरेश लालासाहेब घोडके (वय ६०) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित म्हणून ओंकार गणेश कदम (वय १८) आणि जनाबाई भारत घोडके (वय ५०) यांना वैराग पोलिसांनी अटक केली आहे. मृत सुरेश घोडके यांचा भिशी चालविण्याच्या आर्थिक व्यवहारातून जनाबाई घोडके व इतरांशी वाद होता. त्यांच्यात भांडण झाले होते. मृत सुरेश घोडके यांचा मुलगा दादासाहेब घोडके हा सकाळी वडिलांसोबत शेतात जाऊन परत आला होता. त्यानंतर गावात सुरेश घोडके यांच्यावर लोखंडी सळईने आणि काठीने हल्ला करण्यात आला. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे पुढील तपास करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande