सोलापूर, 5 फेब्रुवारी (हिं.स.)।
करमाळा कुर्डूवाडी बस आगारास नवीन बस मिळाव्यात तसेच मतदारसंघातील समस्या बाबत बैठक घेण्याची मागणी आमदार नारायण पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.यावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
करमाळा मतदारसंघातील करमाळा व कुर्डुवाडी आगारातील नादुरुस्त बस व असुविधेमूळे वेळापत्रक कोडमडलेले आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.त्यामुळे दोन्ही आगारास प्रत्येकी 30 नवीन बसेस देण्यात याव्यात अशी मागणी आमदार नारायण पाटील यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. 2023 मध्ये करमाळा आगारात 76 बसेस होत्या मात्र सद्यस्थितीत 56 बसेस असून त्यापैकी 50 बसेसमधून प्रवाश्यांची वाहतूक होत आहे. कुर्डूवाडी आगाराचीही स्थिती बिकट असून तेथेही बसेस आवश्यक आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड