विदर्भ राज्य आंदोलन समितीचे २३ व २४ रोजी अधिवेशन 
अमरावती, 5 फेब्रुवारी (हिं.स.) :विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलनाची तीव्रता वाढण्याच्या दृष्टीने लोकसहभाग वाढविण्याच्या हेतुने व लढ़कच्या खंबीर वैचारीक कार्यकत्यांचा आंदोलनात सक्रीय सहभाग वाढविण्यासाठी तिसरे अधिवेशन येत्या २३ व २४ मार्च रोजी नागपूर
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे २३ व २४ रोजी अधिवेशन पत्रकार परिषदेत अॅड. वामनराव चटप यांनी दिली माहिती


अमरावती, 5 फेब्रुवारी (हिं.स.) :विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलनाची तीव्रता वाढण्याच्या दृष्टीने लोकसहभाग वाढविण्याच्या हेतुने व लढ़कच्या खंबीर वैचारीक कार्यकत्यांचा आंदोलनात सक्रीय सहभाग वाढविण्यासाठी तिसरे अधिवेशन येत्या २३ व २४ मार्च रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. याबाबतची माहीती आज माजी आमदार व विदर्भवादी अॅड. बामनराव चटप यांनी दिली.

स्थानिक राजापेठ येथील अमरावती श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी सांगितले की, विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाचे स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय आहे.राज्यकत्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. आम्ही स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीसाठी संघर्ष करीत आहोत. हाच संघर्ष पुढेही सुरु राहणार आहे. नागपूर येथे २३ व २४ मार्च रोजी विदर्भ राज्य आंदोलनात सक्रियता वाढविण्यासाठी तिसरे अधिवेशन होत आहे. अधिवेशनात विदर्भाचा अनुशेष अभ्यासातुन मांडण्यात येणार आहे.आज विदर्भात आ वासून उभ्या असलेला शेतकरी आत्महत्या, प्रदुषण, कुपोषण व त्यामुळे होणारे बालमृत्यु व गंभीर माता मृत्यू बेरोजगारीमुळे तयार झालेला नक्षलवादाचा गंभीर प्रश्न यावर सखोल अभ्यास करून मांडणी करण्याकरीता विद‌र्भातील समाजमन जागविण्याकरीता अधिवेशनाचे आयोजन केले आहे.विदर्भाचे राज्य हे सहाम व शिलकीचे होणार आहे, हे दर्शविणारा अर्थसंकल्प डॉ. श्रीनिवास खांदेवाले मांडणार आहे.विदर्भाचे राज्य निर्माण करण्याचे अधिकार घटनेतील कलम ३ प्रमाणे केंद्र सरकारला असुन विदर्भातील जनतेचे व्यापक जनहित लक्षात घेऊन केंद्रसरकारने १२० वर्षापासुन (सन १९०५) सुरु असलेली विदर्भ राज्याची मागणी निकाली काढण्याकरीता, निर्णय घेऊन तात्काळ विदर्भ राज्य निर्माण करावे व विदर्भातील माणसालादेशातील इतर नागरीकाप्रमाणे 'माणुस म्हणून सन्मानाने व सुखाने जगण्याचा अधिकार प्रदान करावा यासाठीचा लढा अधिवेशनानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवुन तीव्र केला जाणार आहे. याकरिताच सदर अधिवेशन असल्याचे अॅड. वामनराव चटप यांनी सांगितले.पत्रपरिषदेला समितीच्या पदाधिकारी श्रीमती रंजना मामडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगरकर, दिलीप घोवर, प्रा. पी. आर. राजपूत, डॉ. विजय कुबडे, रियाज खान, सुनील साबळे, गणेश कुसराम, अशोक हांडे, विनाताई मुडे, पांडुरंग सोनवणे, प्रकाशभाई लड्का, सतीश प्रेमलबार उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande