अमरावती, 5 फेब्रुवारी (हिं.स.) :
महानगर पालिकेला केंद्र सरकारकडून शहरातील हवा शुद्ध राहावी यासाठी ५० इलेक्ट्रीक बसेस मंजूर झाल्या असून त्यासाठी मनपाला शहरात आवश्यक मोठी जागाच मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे मनपाने जिल्हाधिकाऱ्यांकडे कोंडेश्वर नाका येथील २ हेक्टर शासनाची ई-क्लास जमीन मागितली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव शासनाच्या महसूल मंत्रालयाकडे पाठवला असून येत्या १५ दिवसांत जागा मनपाला मिळण्याची शक्यता आहे, सध्या फाईल मंजुरीसाठी उपमुख्यमंत्र्यांकडे असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली. जमीन मिळाल्यानंतर लगेच तेथे इलेक्ट्रीक सिटी बससाठी डेपो उभारता येईल. या ठिकाणी चार्जिंग स्टेशन, इलेक्ट्रीक बस डेपो व त्यांच्या देखभाल दुरुस्तीचेकेंद्र राहणार असल्याची माहिती मनपाच्या कार्यशाळा विभागाद्वारे देण्यात आली.मनपाला १० लाख लोकसंख्येच्या आतील शुद्ध हवेचे शहर म्हणून प्रथम पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे शहरातील हवा ही पावती यासाठी केंद्र शासनाने त्याचवेळी जास्तीत जास्त स्वच्छ असावी, इलेक्ट्रीक बससाठी प्रस्ताव तयार करून पाठवण्यास सांगितले होते. त्यानंतर मनपाने प्रस्ताव तयार करून तो केंद्र शासनाकडे पाठवला. हा प्रस्ताव केंद्राला मिळाल्यानंतर एका महिन्यातच ५० इलेक्ट्रीक बसेस मंजूर करण्यात आल्या.एकाचवेळी ९ मीटरच्या ५० तर १२ मी.च्या १० अशा एकूण ५० इलेक्ट्रीक बसेस उभ्या राहतील, एवढी मोठी जागा शहरात सध्या मनपाकडे उपलब्ध नाही. कारण, यासाठी किमान काही एकर जागा लागणार आहे. एवढी जागा सध्या शहरात मनपाला मिळणे शक्य नाही.त्यामुळे त्यांनी कोंडेश्वर या भागातील जागा निश्चित केली आहे. शासनाकडून जागा मनपाला हस्तांतरित झाल्यानंतर लगेच काम सुरू केले जाईल. मनपाने शहरात जागेचा बराच वेळ शोध घेतला. परंतु, हवी तशी जागा मिळाली नसल्याने अखेर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेची मागणी केली.
यासंदर्भात महापालिका आयुक्त सचिन कलंत्री यांनी सांगितले की येत्या ८ ते १५ दिवसांत जमिनीचा ताबा मिळण्याची शक्यता आहे. प्रस्ताव सध्या उपमुख्यमंत्र्यांकडे गेला आहे. इलेक्ट्रीक बसेस सुरू झाल्यानंतर इंधनावर चालणाऱ्या सिटी बसेस पूर्णतः बंद केल्या जातील. त्यामुळे शहरातील वायू प्रदूषण कमी होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी