राज्यसभेत डॉ. अनिल बोंडेंचा मोठा दावा
अमरावती, 5 फेब्रुवारी (हिं.स.) :भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी मंगळवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूबाबत मोठा दावा केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना काँग्रेसवर निशाणा साधताना बोंडे यांनी हा दावा केला आहे. त्यांनी डमी बापू, लिब्रांडू असे शब्द वापरल्याने राज्यसभेत वादही निर्माण झाला.अनिल बोंडे यांनी राज्यसभेत मंगळवारी १७ मिनिटे भाषण केले. ब्रोंडे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोर्दीच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. जवळपास १७ मिनिटांच्या भाषणात त्यांनी महाराष्ट्रातील विकासासह दिल्लीतील असुविधांचा उल्लेख करून त्यावरून आम आदमी पक्षावर निशाणा साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवडणुकीविषयीच्या धनंजय कीर यांच्या लेखनाचा संदर्भ देताना बोंडेनी सांगितले की, पंतप्रधान नेहरू असताना निवडणूक आयोगाने आंबेडकरांची ७८ हजार मते अवैध ठरवली होती. नेहरू दोनदा विरोधात प्रचारासाठी गेले होते. जयप्रकाश नारायण यांनीही संशय व्यक्त केला होता. आंबेडकरांना केवळ प्रचार करून हरवले नाही तर ७८ हजार मते अवैध ठरवून हरविण्यात आले. एकदा पराभव झाल्यानंतर आंबेडकर । आजारी पडले होते, त्यांना डायबिटीज सुरू झाला. भंडाराच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने आंबेडकरांचा पराभव केला. तिथेही पंतप्रधान । प्रचाराला गेले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या । दत्तोपंत ठेंगडी यांनी आंबेडकरांचा प्रचार केला होता. १९५४ मध्ये पराभवाचा मोठा धक्का आंबेडकरांना बसला होता. हा धक्का बसल्यानंतर १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर हे जग सोडून गेले. ते दोन पराभव त्यांच्या मृत्यूला जबाबदार होते, असे बोंडे म्हणाले. आंबेडकरांच्या मृत्यूलाही हे दोन पराभव जे काँग्रेसने जाणीवपूर्वक केले होते, तेच जबाबदार होते. महाराष्ट्रात जे बोलले जात होते तेच मी सांगत आहे, असा मोठा दावा बोंडे यांनी यावेळी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी