मिनी सरस मध्ये महिलांच्या उत्पादनांना मोठा प्रतिसाद; 21 लाख रुपयांची उलाढाल
नंदुरबार 5 फेब्रुवारी (हिं.स.) ग्रामीण महिलांच्या उद्योगक्षमतेला चालना देणारे मिनी सरस प्रदर्शन 2025 उत्साहात संपन्न झाले. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, सात दिवसांच्या कालावधीत तब्बल 21 लाख रुपयांची
मिनी सरस मध्ये महिलांच्या उत्पादनांना मोठा प्रतिसाद; 21 लाख रुपयांची उलाढाल


नंदुरबार 5 फेब्रुवारी (हिं.स.) ग्रामीण महिलांच्या उद्योगक्षमतेला चालना देणारे मिनी सरस प्रदर्शन 2025 उत्साहात संपन्न झाले. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, सात दिवसांच्या

कालावधीत तब्बल 21 लाख रुपयांची उलाढाल झाली.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर शेजारील डोम येथे 27 जानेवारीपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाची सुरुवातीला 31 जानेवारी पर्यंतची मुदत होती. मात्र, नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी 1 व 2 फेब्रुवारी पर्यंत कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महिला गटांचा उत्पादनक्षमतेला हक्काचा मंच

या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते झाले होते. यावेळी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल

गावडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक (LDM) सचिन गांगुर्डे, उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक

यशवंत ठाकुर आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील 18 हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून 1.80 लाख कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले

आहे. हे गट आता विविध उत्पादनांमध्ये नाविन्य आणत स्वतःच्या व्यवसायात पुढे जात आहेत.

75 स्टॉल्सला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद-

या प्रदर्शनात 75 स्टॉल्स उभारण्यात आले होते, जिथे हस्तकला वस्तू, परंपरागत खाद्यपदार्थ, कपडे,

गृहसजावटीच्या वस्तू आदी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. जिल्हा प्रशासन आणि उमेद अभियानाच्या

प्रयत्नांमुळे या गटांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.

डिजिटल व्यापार आणि नव्या संधींना गती

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी महिलांना डिजिटल पेमेंट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करून

व्यवसाय वाढवण्याचे मार्गदर्शन केले. भविष्यात महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांमध्ये

संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालक सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

या प्रदर्शनाला नंदुरबार जिल्ह्याचे पालक सचिव बी. वणूगोपाल रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त,

तहसीलदार पवन दत्ता यांनीही भेट देत महिलांच्या उत्पादनांचे कौतुक केले.

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ठोस पाऊल

महिला बचत गटांना स्थैर्य देणारा हा उपक्रम महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा यशस्वी प्रवास दर्शवतो.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी सांगितले की, महिला उत्पादक गटांना

फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून आणखी संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

यशस्वी सांगता

ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ मिळवून देणारे हे प्रदर्शन मोठ्या

उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनाला लेखाधिकारी मनिषा कुलकर्णी, जिल्हा व्यवस्थापक उमेश अहिरराव,

कार्यालयीन अधिक्षक चंद्रकांत चावरे, अजय जाधव, ईश्वर जगदाळे, संजीवन संन्याशी, प्रकाश वळवी,

मिनाक्षी वळवी, कुणाल कानडे, राहुल सोवणणे, रत्ना ओझरे, नितीन चौधरी, तसेच जिल्हा आणि तालुका

कक्षातील सर्व व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक व महिला बचत गटांच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

होती.

या यशस्वी प्रदर्शनामुळे महिलांना नव्या आर्थिक संधी उपलब्ध झाल्या असून, भविष्यात अशा उपक्रमांना

आणखी गती देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहील.ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना

स्थानिक बाजारपेठ मिळवून देणारे हे प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यामुळे बचत गटांमध्ये नव्या

उमेदीची लाट निर्माण झाली असून, त्यांना भविष्यात आणखी संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन

प्रयत्नशील राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande