राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा. कौसल्या आणि ओम कडे नेतृत्वाची धुरा.
नाशिक, 11 मार्च (हिं.स.) : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव येथे दिनांक १३ ते १६ मार्च दरम्यान ६० वी पुरुष आणि महिला खो खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्हयाचे पुरुष आणि महिला संघ १५ दिवसाच्या सराव शिबिरा
राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा. कौसल्या आणि ओम कडे नेतृत्वाची धुरा.


राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा. कौसल्या आणि ओम कडे नेतृत्वाची धुरा.


नाशिक, 11 मार्च (हिं.स.) : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव येथे दिनांक १३ ते १६ मार्च दरम्यान ६० वी पुरुष आणि महिला खो खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्हयाचे पुरुष आणि महिला संघ १५ दिवसाच्या सराव शिबिरानंतर जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्रात महिला संघाची कर्णधार म्हणून आंतर विद्यापीठ खो खो स्पर्धेतील सर्वोत्तम संरक्षक पुरस्कार मिळविणारी विद्यापीठ खेळाडू कुमारी कौसल्या पवार हिच्या कडे महिला संघाची कर्णधार पदी निवड करण्यात आली आहे. या संघात एस एम आर के महिला महाविद्यालयाच्या ५ खेळाडूंनी तर लोकनेते व्यंकटराव हिरे पंचवटी महाविद्यालयाच्या ४ खेळाडूंनी, वाय. डी.बिटको कनिष्ठ महाविद्यालयाच्या ५ खेळाडूंनी आणि शासकीय माध्यमिक कन्या शाळेच्या एका खेळाडूने संघात स्थान मिळविले आहे.संघातील उर्वरित खेळाडू पुढीलप्रमाणे. ताई पवार, सुषमा चौधरी, तेजल सहारे, जयश्री महाले, हितेशा जाधव, दिदी ठाकरे, ऋतुजा सहारे, मनिषा पडेर, नमिषा भोये, सरीता दिवा, ज्योती मेढे, दिक्षा सिताड, विद्या मिरके, प्रियांका गावंडे. या संघात सात राष्ट्रीय,चार विद्यापीठ तर चार राज्य पदक विजेत्या खेळाडूंचा समावेश आहे. पुरुष संघाचा कर्णधार म्हणून विद्यापीठ खेळाडू ओम कांगणे ह्याची निवड करण्यात आली आहे. उर्वरित संघ पुढील प्रमाणे. किरण जाधव,मनोज पवार, यशवंत वाघमारे, जगन फौजदार, गणेश राठोड, विकास बैसाने, दीपक चारस्कर, कौशिक चौधरी, अशोक सोनार, रवींद्र ठाकरे, अभिजित राऊत, रोशन मुरे, गुलाब वाघमारे, मच्छिंद्र वाघमारे. या संघात दोन राष्ट्रीय तर तीन विद्यापीठ खेळाडूंनी स्थान मिळविले आहे. दोन्ही संघांना नाशिक जिल्हा खो खो असो.चे अध्यक्ष डॉ. प्रदीप पवार, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले,कार्याध्यक्ष आनंद गारंमपल्ली, सचिव उमेश आटवणे,खजिनदार सुनील गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande