मत्स्यजोग प्रकरणातील फरार आरोपी अंधाळेला नाशिकमध्ये ?, पोलीस तपास सुरू
नाशिक, 12 मार्च (हिं.स.)।- मत्स्यजोग प्रकरणातील फरारी असलेला आरोपी कृष्णा आंधळे ला नाशिक मध्ये नागरिकांनी बघितल्याचा दावा करण्यात आला आहे पोलीस मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेत आहे परंतु कोणतीही ठोस माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही त्यामुळे न
मत्स्यजोग प्रकरणातील फरार आरोपी अंधाळेला नाशिकमध्ये ?, पोलीस तपास सुरू


नाशिक, 12 मार्च (हिं.स.)।- मत्स्यजोग प्रकरणातील फरारी असलेला आरोपी कृष्णा आंधळे ला नाशिक मध्ये नागरिकांनी बघितल्याचा दावा करण्यात आला आहे पोलीस मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेत आहे परंतु कोणतीही ठोस माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांनी केलेला दावा हा किती विश्वास पात्र आहे याची देखील पडताळणी केली जात आहे.

बीड जिल्ह्यातील मत्स्यजोग येथील सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे दिल्यानंतरही याप्रकरणी पोलिसांच्या यादीमध्ये असलेला आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांना सापडू शकला नाही मधल्या काळामध्ये या प्रकरणातील आरोपींनी नाशिक मध्ये दिंडोरी येथील एका आश्रमामध्ये आश्रय घेतल्याची चर्चा होती आणि त्याबाबत ज्येष्ठ समाजसेविका तृप्ती देसाई यांनी देखील त्याचा आरोप केला होता त्याबाबतचा फुटेज देखील असल्याचे सांगितले जात होते. तर येथील एका आरोपीने आपण आपला मोबाईल फोन नाशिक मध्ये फेकून देण्याचे पोलिसांना सांगितले होते.

या प्रकरणातील सुमारे 83 दिवसापेक्षा अधिक दिवस झालेल्या असतानाही आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांना संपून आला नाही मधल्या काळामध्ये तो नाशिक मधील नाशिक रोड या परिसरामध्ये बघितल्या गेल्याची चर्चा होती त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी याही परिसरामध्ये त्या वेळी शोध घेतला होता परंतु कृष्णा आंधळे घेऊन आला नाही परंतु आज मंगळवारी 9 वाजेच्या सुमारास गंगापूर रोड ते मखमलाबाद या लिंक रोड असलेल्या गंगापूर रोडवरील दत्त मंदिरात नऊ ते सव्वा नऊ वाजेच्या सुमारास कृष्णा आंधळे दर्शन घेण्यासाठी आल्याचे येथील नागरिकांनी बघितले आणि त्याबाबतची माहिती ही गंगापूर पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच गंगापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या ठिकाणी तपास सुरू केला या ठीक परिसरात असलेले आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्या दृष्टिकोनातून तपास सुरू असल्याचे नाशिक पोलिसांनी सांगितले आहे परंतु स्थानिक नागरिकांनी ज्या विश्वासाने माहिती दिलेली आहे ती माहिती ही कृष्णा आंधळेचीच आहे का याबाबत मात्र पोलिसांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे त्यामुळे कृष्णा आंधळे हा नाशिक मध्ये आहे की नाही हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande