धावत्या मोटरसायकलवरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू
जळगाव, 12 मार्च (हिं.स.) धावत्या मोटरसायकलवरून पडल्याने एक ३९ वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा गावा जवळ १२ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात
धावत्या मोटरसायकलवरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू


जळगाव, 12 मार्च (हिं.स.) धावत्या मोटरसायकलवरून पडल्याने एक ३९ वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा गावा जवळ १२ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सरुबाई भिकन पाटील (वय – ३९ वर्ष) रा. सारोळा ता. पाचोरा असे अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सरुबाई पाटील ह्या पती भिकन पाटील यांचेसह छत्रपती संभाजी नगर येथे नातेवाईकांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. दरम्यान १२ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर येथुन आपल्या सारोळा या गावी येत असतांनाच खडकदेवळा गावाजवळ रस्त्यांची झालेली दुरावस्था यात मोटरसायकलवर मागे बसलेल्या सरुबाई पाटील यांचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या व त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहेण घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विकास खरे हे करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande