पुणे, 12 मार्च (हिं.स.)।
आलिशान गाडीतून येताना येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्यावर थांबून लघुशंका केल्याप्रकरणी दोघा आरोपींच्या जामीन अर्जावर येत्या १७ मार्चला न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने गौरव आहुजा याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तर, त्याचा मित्र भाग्येश ओसवाल हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये या दोघांनी शुक्रवारी रात्रभर पार्टी केली. त्यानंतर आलिशान गाडीतून येताना शास्त्रीनगर चौकात रस्त्यावर मधोमध थांबून लघुशंका आणि अश्लील कृत्य केले. या प्रकरणी गौरव मनोज आहुजा (वय २५, रा. साठे कॉलनी, टिळक रस्ता) आणि त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (वय २२, रा. प्राइड हाइट्स सोसायटी, मार्केटयार्ड) या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली होती.
भाग्येश ओसवाल याला सोमवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर, गौरव आहुजाच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ केली होती. गौरव याची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु