दत्ता गाडे याला न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
पुणे, 12 मार्च (हिं.स.) स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची रवानगी आता येरवडा तुरुंगात करण्यात येणार आहे. दत्ता गाडेची पोलीस कोठडी आज संपणार होती. त्यामुळे आज त्याला न्यायालय
दत्ता गाडे याला न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


पुणे, 12 मार्च (हिं.स.) स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची रवानगी आता येरवडा तुरुंगात करण्यात येणार आहे. दत्ता गाडेची पोलीस कोठडी आज संपणार होती. त्यामुळे आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

स्वारगेट बसस्थानकावर एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी ७५ तासांत आरोपी दत्ता गाडे याला अटक केली होती. याप्रकरणी अनेकांनी तरुणीवरच संशय व्यक्त केला होता. तसेच पूर्वीची ओळख असल्याचा दावा देखील काहींनी केला होता. पण त्यामुळे तरुणीला मानसिक त्रास झाला. पण तपासात आरोपी दत्ता गाडेनेच तरुणीला जाळ्यात ओढल्याचे व तसेच त्याने अनेक कारनामे केल्याचे उघड झाले होतं.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande