ढाका , 13 मार्च (हिं.स.)।शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून परतरणार आहेत. असे विधान अवामी लीगचे नेते आणि शेख हसीना यांचे जवळचे सहकारी डॉ. रब्बी आलम यांनी केले आहे.यासोबतच, शेख हसीना यांना सुरक्षित आश्रय आणि प्रवासाचा मार्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
डॉ. रब्बी आलम यांनी एका मुलाखतीत म्हणाले की, शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून परत येतील. तरुण पिढीने चूक केली आहे, पण ती त्यांची चूक नाही, त्यांना दिशाभूल करण्यात आले आहे, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांनी पदमुक्त व्हावे आणि जिथून आलात तिथे परत जाण्याचे आवाहन केले. हा बांगलादेशच्या लोकांना संदेश आहे की शेख हसीना परत येत आहेत, त्या पंतप्रधान म्हणून परत येत आहेत, असंही ते म्हणाले. यासोबतच, शेख हसीना यांना आसरा दिल्याबद्दल आलम यांनी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत.
डॉ. रब्बी आलम यांनी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून हस्तक्षेपाची मागणी केली. ते म्हणाले, बांगलादेशवर हल्ला होत आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राजकीय बंडखोरी ठीक आहे, पण बांगलादेशात असे घडत नाही. ही एक दहशतवादी बंडखोरी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode