होळी एकतेचे रंग दृढ करेल”- पंतप्रधान
राजनाथ सिंह यांनी देखील दिल्या शुभेच्छा नवी दिल्ली, 14 मार्च (हिं.स.) : होळी हा उत्साहाने भरलेला सण असून आनंद देणाऱ्या या उत्सवातील उत्साह एकतेचे रंग दृढ करेल अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होलिकोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात
नरेंद्र मोदी, पंतप्रधान


राजनाथ सिंह यांनी देखील दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 14 मार्च (हिं.स.) : होळी हा उत्साहाने भरलेला सण असून आनंद देणाऱ्या या उत्सवातील उत्साह एकतेचे रंग दृढ करेल अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होलिकोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) दिलेल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधान म्हणाले की, ‘सर्वांना होळीच्या शुभेच्छा. उत्साहाने भरलेला हा सण आनंदाचा उत्सव उत्साह वाढवेल, एकतेचे रंग अधिक दृढ करेल.’ असे मोदींनी आपल्या शुभेच्छा संदेशात नमूद केले आहे. यासोबतच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये राजनाथ सिंह म्हणाले की, ‘होळीच्या पावन पर्वाच्या सर्वांना खूप शुभेच्छा. आनंद आणि उत्साहाचे प्रतीक असलेला हा सण तुमच्या जीवनात आनंदाचे आणि आरोग्याचे रंग घेऊन येवो. आनंदी आणि सुरक्षित होळीसाठी शुभेच्छा असे राजनाथ यांनी नमूद केले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande