नवी दिल्ली, 14 मार्च (हिं.स.) : होळीच्या सणानिमित्ताने महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देशवासियांना होळीनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, ‘रंगाचा सण असलेल्या या होळी सणाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा. हा सण एकात्मता आणि प्रेमाचा संदेश देतो. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा हा सण प्रतीक आहे. या पावन पर्वनिमित्त आपण भारत मातेची सर्व मुलं एकत्र येऊन समृद्ध आणि प्रगतिशील जीवनासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी