कल्याण - दोन स्कशन पंप आणि एक बार्जसह १५ लाखांचा मुद्देमाल नष्ट
ठाणे, 30 मार्च (हिं.स.)।- ठाणे जिल्ह्यातील अवैध वाळुउपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत.शनिवारी सकाळ पासुन भरारी पथक ठाणे मुब्रा ते मोठागाव परिसरात गस्त घालत असताना खाडी पात्रात एक अवैध वाळु उपसा करणारी बोट आणि दोन स
कल्याण


ठाणे, 30 मार्च (हिं.स.)।- ठाणे जिल्ह्यातील अवैध वाळुउपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत.शनिवारी सकाळ पासुन भरारी पथक ठाणे मुब्रा ते मोठागाव परिसरात गस्त घालत असताना खाडी पात्रात एक अवैध वाळु उपसा करणारी बोट आणि दोन संक्शन पंप खाडी पात्रात आढळुन आले त्यानतंर भरारी पथकाने तात्काळ बोट ताब्यात घेउन संक्शन पंप जागीच बुडवले तर एक बोट ताब्यात घेऊन बोटीवर तोडक कारवाई केली. या कारवाई दरम्यान ठाणे महसुल टीम,मेरीटाईन बोर्ड आणि वन पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली.या कारवाई १५ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असुन खाडी पात्रात अवैध वाळु उपसा करणाऱ्या बोटी फिरत असतील तर त्यांच्यावर अश्याच पद्धतीने कारवाई केली जाईल असे महसुल अधिकारी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले.

या कारवाई दरम्यान कल्याण महसुल टीम आणि नायब तहसिलदार सत्यजीत चव्हाण, अप्पर कल्याण मंडळ अधिकारी,तलाठी टीम, मेरिटाईन बोर्ड, वन विभाग यांच्या माध्यमातुन यशस्वी कारवाई करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande