सोलापूर : रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरणार्‍यांना अटक
सोलापूर, 1 एप्रिल (हिं.स.)। व्यसनपूर्ती आणि मौजमजा करण्यासाठी धावत्या रेल्वेतून व रेल्वे स्थानकातून प्रवाशांचे हातोहात मोबाईल चोरणार्‍या सराईत तिघा चोरट्यांना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ मोबाईल फोन हस्तगत केल्याची माहिती ल
सोलापूर : रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरणार्‍यांना अटक


सोलापूर, 1 एप्रिल (हिं.स.)।

व्यसनपूर्ती आणि मौजमजा करण्यासाठी धावत्या रेल्वेतून व रेल्वे स्थानकातून प्रवाशांचे हातोहात मोबाईल चोरणार्‍या सराईत तिघा चोरट्यांना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ मोबाईल फोन हस्तगत केल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

नवनाथ किशन भारती (वय 28 रा. गंगाभेट,नांदेड), आकाश उर्फ विकास अंबादास राजगुरू (वय 32, रा. बीड), प्रकाश खेलावन चव्हाण (वय 27, रा. उत्तर प्रदेश, सध्या जेऊर रेल्वे स्टेशन) आणि अल्ताफ चांद शेख (वय 47, रा. चांगदेव नगर, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाणे येथे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सोलापूर लोहमार्ग पोलिस व आरपीएफ सोलापूर यांच्या संयुक्त कामगिरीने सोलापूर रेल्वे स्टेशनवरील तसेच रेल्वेतून प्रवास करणारे प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन मोबाईल चोरी तसेच इतर सामान चोरी करणार्‍या टोळीचा पाठलाग करून तीन आरोपींना पकडण्यात यश आले.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande