जळगाव : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा केला खून
जळगाव, 1 एप्रिल (हिं.स.) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन संतोष शामराव तायडे याने आपली पत्नी आशा संतोष तायडे (वय ३८, रा. आभोडा, ता. रावेर) यांचा गळा आवळून खून केला. ही घटना सोमवार, १ एप्रिल रोजी उघडकीस आली. खून केल्यानंतर संतोष स्वतः रावेर पोलीस ठा
जळगाव : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा केला खून


जळगाव, 1 एप्रिल (हिं.स.) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन संतोष शामराव तायडे याने आपली पत्नी आशा संतोष तायडे (वय ३८, रा. आभोडा, ता. रावेर) यांचा गळा आवळून खून केला. ही घटना सोमवार, १ एप्रिल रोजी उघडकीस आली. खून केल्यानंतर संतोष स्वतः रावेर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. आभोडा (ता. रावेर) येथे आशा आणि संतोष तायडे हे दाम्पत्य शेती आणि मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. संतोषला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. तिच्याकडील पैशांबाबत विचारणा केल्यावर ती स्पष्ट उत्तर देत नसल्याने त्यांच्यात वाद होत होते. पहाटे ४ वाजेच्या सुमारास आशा गाढ झोपेत असताना संतोषने गळा आवळून तिचा खून केला. सकाळी ८ वाजता तो स्वतः पोलीस ठाण्यात गेला आणि गुन्ह्याची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील, उपनिरीक्षक दीपाली पाटील, पोहेकॉ ईश्वर चव्हाण, कल्पेश आमोदकर, मुकेश मेढे, संदीप पाटील आणि अतुल गाडीलोहार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. पोलीस पाटील राजू नुरखा तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांनी संतोष तायडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आणि त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.

----------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande