सोलापूर, 30 मार्च (हिं.स.)।
शहरातील सिद्धेश्वर पेठ येथील बंद घराचे कुलूप तोडून घरातील दागिने चोरणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याला अटक करीत शहर गुन्हे शाखेच्या पथकाने 110 ग्रॅम सोन्याचे व 113 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. अनिलकुमार मिस्त्रीलाल राजभर (वय 38, रा. बोदरी, जि. जौनपुर, राज्य उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शहरातील जि. प. चे शिक्षणाधिकारी कादर राजूमियाँ शेख (वय 50, रा. प्लॉट नंबर 602 सेंटर पार्क अपार्टमेंट सिद्धेश्वर पेठ) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप कडीकोंयड्यासह तोडून अज्ञात चोरट्याने 10 तोळे वजनाचे सोन्याचे-दागिने व दहा तोळे वजनाचे चांदीचे दागिने रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत शेख यांच्या फिर्यादीवरून जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड