पुणे, 2 एप्रिल, (हिं.स.)। पुण्यातील येरवडा भागातील उड्डाणपुलावर अशी एक घटना घडली आहे की यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या अनेक वाहनांना अचानक ब्रेक लावण्याची वेळ आली. यामुळे अचानक अनेक वाहने पूलावर थांबल्याने एकच गोंधळ उडाला.
येरवडा येथील गोल्फ क्लब कोर्समध्ये गोल्फ खेळताना खेळाडूने मारलेला चेंडू थेट बाहेरील उड्डाणपूलावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या छातीला लागला. त्यानंतर चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांवर देखील आदळला. यामुळे अनेक वाहनांना अचानक ब्रेक दाबण्याची वेळ आली. अचानक आलेल्या चेंडूमुळे वाहनचालकांचा एकच गोंधळ उडाला.
या प्रकरणी प्रणील कुसळे या ३५ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाने गोल्फ क्लब प्रशासनाविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. घटना शनिवारी घडून देखील गोल्फ क्लब प्रशासनाविरोधात कोणतीही अॅक्शन घेण्यात आली नव्हती. अखेर व्यवस्थापकाविरुद्ध दोन दिवसांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु