सोलापूर - पोलिसांना शिवीगाळ अन्‌ दमदाटी : माजी आमदारपुत्रासह सहा जणांविरोधात गुन्हा
सोलापूर, 2 एप्रिल (हिं.स.)। बोरगाव (ता. करमाळा) हद्दीत सीना नदी पात्रात अवैधरीत्या वाळू चोरी करत असताना कारवाई करण्यास गेलेल्या पोलिस कर्मचारी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूरा
सोलापूर - पोलिसांना शिवीगाळ अन्‌ दमदाटी : माजी आमदारपुत्रासह सहा जणांविरोधात गुन्हा


सोलापूर, 2 एप्रिल (हिं.स.)। बोरगाव (ता. करमाळा) हद्दीत सीना नदी पात्रात अवैधरीत्या वाळू चोरी करत असताना कारवाई करण्यास गेलेल्या पोलिस कर्मचारी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांच्यासह सहा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिस शिपाई अमोल शहाजी रंदील (वय ३४, करमाळा पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, खबऱ्यामार्फत सीना नदीपात्रात वाळू उपसा होत असल्याची बातमी मिळाली. आम्ही वरील सर्वजण दुचाकीवरून बोरगाव येथे सीना नदीच्या पात्रात गेलो असता आम्हास नदीपात्रात एक ट्रॅक्टरचालक ट्रकसह सीना नदीपात्रातून वाळू काढून ठिक्यात भरून घेऊन जात असताना दिसला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande