आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी
चंद्रपूर, 10 एप्रिल (हिं.स.)। तुकुम विभाग क्रमांक 1 येथील स्टेट बँक कॉलनी मधील रहिवासी पंचफुला मडावी कुलमेथे यांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धमकावून त्यांना त्यांच्याच घरातून आणि जमिनीतून हाकलून लावण्याचा प्रयत्न
आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी


चंद्रपूर, 10 एप्रिल (हिं.स.)।

तुकुम विभाग क्रमांक 1 येथील स्टेट बँक कॉलनी मधील रहिवासी पंचफुला मडावी कुलमेथे यांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धमकावून त्यांना त्यांच्याच घरातून आणि जमिनीतून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हे कुटुंब भीतीच्या वातावरणात जगत आहे. या संदर्भात तक्रार करूनही पोलिस यंत्रणेकडून कसलीही कारवाई केली जात नाही. या संदर्भात, शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी पत्रकार परिषदेद्वारे पोलिस प्रशासनाकडे आदिवासी कुटुंबाला धमकावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दे.गो. तुकूम प्रभाग क्रमांक 1 स्टेट बैंक कालोनी मध्ये मागील 11 ते 12 ते अधिक वर्षापासून पंचफुला मडावी -कुलमेथे येथे निवासीत आहेत. ही जमीन वडिलोपार्जित असल्याने, अनेक लोकांची या जमिनीवर वाईट नजर आहे. गेल्या काही वर्षांपासून बल्लारपूरचे रहिवासी अभय सिंग कचवा, कमल सिंग कचवा, दिलीप वावरे, बादल खुशाल उराडे, तेजस दवे, मोना दवे यांची आदिवासी कुलमेथे कुटुंबाच्या जमिनीवर वाईट नजर आहे आणि ते त्यांना पैशाच्या जोरावर धमकी देऊन तेथून हाकलून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे कुलमेथे कुटुंब नेहमीच भीतीच्या वातावरणत जगत असते. आदिवासी कुटुंबाला धमकावून त्यांची जमीन बळकावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande