पुणे, 10 एप्रिल (हिं.स.)।
पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढावी आणि मोठ्या आकाराच्या विमानांना ये-जा करता यावी, यासाठी आवश्यक असणार्या धावपट्टी विस्तारीकरणाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामालाही वेग येणार आहे.कारण हे काम ‘फास्ट ट्रॅक’वर करण्याचे निर्देश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या बैठकीत दिले. यात लोहगावकडे जाणार्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून, पुणे महापालिका हवाई दलाशी समन्वय साधून हा रस्ता करणार आहे.पट्टीच्या विस्तारीकरणाला परवानगी मिळाली होती. त्यानंतर विस्तारी करणासाठी आवश्यक असणारे भूसंपादन, लोहगावचा पर्यायी रस्ता करणे आणि इतर तांत्रिक बाबी याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी वरिष्ठ अधिकार्यांची सविस्तर बैठक बोलावून विविध निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु