पुणे, 10 एप्रिल (हिं.स.)। उन्हाळा कडक असल्याने आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंचायत समितीच्या वतीने तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातील 11 गावांना 11 टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या 11 टँकरच्या दिवसभरात 30 ते 35 फेर्या होत आहेत, अशी माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांनी दिली.तालुक्याच्या पूर्व भागात लोणी, धामणी, शिरदाळे, वडगावपीर, मांदळवाडी तसेच सातगाव पठारावरील पारगाव तर्फे खेड, कुरवंडी, थुगाव, भावडी, कारेगाव व निघोटवाडी या 10 गावांना दरवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या भागात यावर्षी पाऊस कमी झाल्याने तसेच परतीचा पाऊस न पडल्याने लवकरच दुष्काळसदृश्य परिस्थिती जाणवू लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु