अहिल्यानगर, 15 एप्रिल (हिं.स.)।
तोफखाना येथील माळ्याची चावडी येथे हनुमान चालीसा व भजन संध्या मोठ्या उत्साहात संपन्न झाली. दक्षिण मुखी हनुमान सत्संग मंडळ आयोजित सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्या संपन्न झाली. तोफखाना तरुण मंडळ व सुरज जाधव परिवाराच्या वतीने या भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. हनुमान चालीसाच्या गायनाने कार्यक्रमात भक्तीचे रंग उधळले गेले, तर देवा हो देवा ,दुनिया मे देव हजारो हे,चलो बुलाया आया है माता ने बुलाया है,खंडोबाची कारभारीन, चला जाऊ पंढरीला,महाकाल सरकार,म्हणा भक्तो स्वामी समर्थ, दैवत छत्रपती,रामजी की निकली सवारी आदी गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आली. तर, हनुमानाचे पेहराव केलेला युवक सर्वांचे आकर्षण ठरला. यावेळी लोंकानी सामुदायिक पठणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.त्यानंतर हनुमान चालीसा गायन व विविध भजने सादर झाली.हनुमानाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व मित्र मंडळी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.हनुमान चालीसा कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित भाविकांना महाप्रसाद ठेवण्यात आला होता.यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni