मुलांच्या सुदृढ भविष्यासाठी,आत्मविश्‍वास वाढीसाठी कराटे खेळास प्राधान्य द्यावे - हारुण शेख
अहिल्यानगर दि. 15 एप्रिल (हिं.स.) :- मुलांच्या आरोग्या साठी मैदानी खेळ हे आवश्यक आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्टया असल्याने त्याचा सदुपयोग म्हणून मुला-मुलींना मैदानी खेळासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. कराटे खेळा हा स्व:संरक्षणाबरोबर आत्मनिर्भर बनण्यासा
मुलांच्या सुदृढ भविष्यासाठी,आत्मविश्‍वास वाढीसाठी कराटे खेळास प्राधान्य द्यावे


अहिल्यानगर दि. 15 एप्रिल (हिं.स.) :- मुलांच्या आरोग्या साठी मैदानी खेळ हे आवश्यक आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्टया असल्याने त्याचा सदुपयोग म्हणून मुला-मुलींना मैदानी खेळासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. कराटे खेळा हा स्व:संरक्षणाबरोबर आत्मनिर्भर बनण्यासाठी फार उपयोगी आहे. आज विविध बेल्ट परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंनी कठोर मेहनत करुन हे यश संपादन केले आहे. हे खेळाडूं पुढील स्पर्धेसाठी तयार झाले आहेत.पालकांनी आपल्या मुलांच्या सुदृढ भविष्यासाठी, त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढीसाठी कराटे खेळास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन मुख्य प्रशिक्षक हारुण शेख यांनी केले.

वर्ल्ड फुनाकोशि शोतोकान कराटे संस्थेच्यावतीने विविध बेल्ट परिक्षा घेण्यात आल्या.याप्रसंगी मुख्य प्रशिक्षक हारुण शेख, प्रशिक्षक रमजान शेख, तन्वीर खान, दिपाली भालेराव आदी उपस्थित होते. विविध बेल्ट परिक्षेत उत्तीर्ण झालेले पुढीलप्रमाणे : यलो बेल्ट - लवीशा लुनिया, आनव कुमार, जयदिप काळे, सानवी शेंडाळे, स्वरा काळे, हितिका कटारिया, ऑरेंज बेल्ट - मीवान कर्नावट, आर्या पडागळे, समद शेख, शिरीन शेख, ग्रीन बेल्ट - दिवेश कांबळे, प्रियल चुडिवाला, आयुष कुटे, संस्कृति नरोटे, संस्कृति गोरे, ब्ल्यू बेल्ट - उदय शिंदे, दिया गुगळे, ओवी शिंदे. पर्पल बेल्ट - आरुष डांगे, श्रीहरी ईवळे, शौर्य चिंता, ब्रॉऊन बेल्ट - तिरतेशा गुगळे, अनुष्का कोहक, ब्लॅक बेल्ट - अष्कान शाह, फस्ट डेन -श्रावणी काकडे, र्फोथ डेन - विद्धी गुंदेचा, यावेळी इशान होशिंग, अशिष शिंदे, प्रतिक व्यवहारे, अदित्य बोरा, बुर्‍हानुद्दीन हकीमजीवाला, आदिती जाधव, महेक शेख आदि ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande