सोलापूर : केम येथे गोमांस विक्री करणाऱ्यावर कारवाई
सोलापूर, 15 एप्रिल (हिं.स.) करमाळा तालुक्यातील केम येथे विना परवाना गोमांस विक्री केल्याप्रकरणी एका अज्ञात इसमाविरूध्द व विक्रीचे ठिकाण असलेल्या जागा मालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी घटनास्थळावर
सोलापूर : केम येथे गोमांस विक्री करणाऱ्यावर कारवाई


सोलापूर, 15 एप्रिल (हिं.स.) करमाळा तालुक्यातील केम येथे विना परवाना गोमांस विक्री केल्याप्रकरणी एका अज्ञात इसमाविरूध्द व विक्रीचे ठिकाण असलेल्या जागा मालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. केम पोलीस चौकित कार्यरत असलेले अमलदार अमोल घुगे व सहाय्यक पोलीस फौजदार रणदिवे हे ड्युटीवर असताना केम येथील बजरंग दलाचे कार्यकतें मेघराज सुनिल चव्हाण अमोल बिचितकर व अक्षय तळेकर यांनी माहिती दिली कि येथील आणाभाऊ साठे नगर येथील समाज मंदिरासमोर एका पत्राच्या खोलीत गो मांस विक्री सुरू आहे. त्यानुसार, पोलिसांनी व बजरंग दलाच्या कार्यकत्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता एक ईसम पळून गेला. घटनास्थळी तपास केला असता गो मांस, तराजू काटा व इंडिका गाडी क्र, एमएच 42-के-7522 ही गाडी आढळून आली. हि गाडी पळून गेलेल्या इसमाची असल्याचे समजते.

--------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande