कुख्यात गुंडांची तयार होतेय यादी, २२ पासून अमरावती पोलीस आयुक्तांसमोर पेशी
अमरावती, 19 एप्रिल (हिं.स.) शहरात नुकत्याच झालेल्या तीर्थ वानखडे हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय टॉप १० व टॉप २० गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. येत्या २२ एप्
कुख्यात गुंडांची तयार होत आहे यादी २२ पासून पोलीस आयुक्तांसमोर पेशी


अमरावती, 19 एप्रिल (हिं.स.)

शहरात नुकत्याच झालेल्या तीर्थ वानखडे हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय टॉप १० व टॉप २० गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. येत्या २२ एप्रिलपासून पोलीस आयुक्तांसमोर या गुंडांची पेशी होणार आहे. स्थानिक रवीनगर परिसरात तीर्थ वानखडे या युवकाची दोन दिवसांपूर्वीच गटबाजीतून हत्या करण्यात आली. याप्रकरणातील आरोपींविरूध्द कठोर कारवाईच्या मागणीसाठी तीर्थ वानखडेच्या समर्थकांकडून राजापेठ पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्त कार्यालयात मोर्चा काढण्यात आला. आठ दिवसांपूर्वी मसानगंज परिसरात एकायुवकाची हत्या करण्यात आली. यासोबतच लुटमारीच्याही घटना घडल्या. गुन्हेगारी घटनांच्या या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. नवीनचंद्र रेड्डी यांनी गुन्हे शाखेचे विविध तीन पथक तयार केले आहे. पोलीस ठाणेनिहाय गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधिकारी-कर्मचारी कामाला लागले आहेत. या याद्या तयार झाल्यानंतर २२ एप्रिलपासून येथील वसंत हॉल येथे पोलीस आयुक्तांसमोर गुन्हेगारांना हजर केले जाणार आहे. गुन्हेगाराविरूध्द किती गुन्हे व गुन्ह्याचे प्रकार, ते काय करीत आहेत, याबाबतची चौकशी पोलीस आयुक्तांकडून केली जाणार आहे. सण-उत्सव व मंत्र्यांचे दौर आटोपल्यानंतर पोलिसांनी गुन्हेगारांकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande